कोलकातामध्ये आयोजित केलेल्या दोन दिवशीय बंगाल वैश्विक व्यापार शिखर संमेलनात अंबानी बोलत होते. पश्चिम बंगाल या राज्यात मोबाइल फोन आणि सेट टॉपबॉक्स यांची निर्मिती करून इलेक्ट्रॉनिक उद्योगाला प्रोत्साहित केले जाणार आहे. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, आरआयएलने राज्यात दूरसंचार व्यवहारात 15 हजार करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासाठी 4,500 करोड रुपयांची प्रतिबद्धता केली होती. अंबानी म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी आशा आहे.यासाठी रिलायंस ग्रुप पश्चिम बंगाल मध्ये ५००० कोटींची गुंतवणूक करेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews